तटस्थली वृत्ती एकाचे चिंतणी
तटस्थली वृत्ति एकाचे चिंतनी । रंगली रंगणी उल्हासाच्या ॥
नावडे साजिरे जगाचे वैभव । अहंतेचा भाव गळुनी गेला ॥
भोजनी शयनी सद्गुरुचे ध्यान । तयावीण क्षण जाऊ नेदी ॥
तुकड्यादास म्हणे आर्त तोचि खरा । ज्याचा प्रेम-झरा गुरु झाला ।।