सदा तीर्थ - वास गंगेचे सेवन

सद्भक्त -लक्षणे
सदा तीर्थ - वास गंगेचे   सेवन । मुखाने स्मरण   शंकराचे ॥
गळा रूद्रमाळा भस्माचे लेपन । शुद्ध ज्याचे मन गुरुपायी ॥
धैर्याचा धाडसी वैराग्याचा श्वासी । सदा अहर्निशी शुद्ध बुद्ध ॥
तुकड्यादास म्हणे जो पूर्ण निष्काम । तोचि तो परम भक्त त्याचा ॥