सर्वाभूती ज्यासी कळो आला राम

सर्वाभूती ज्यासी कळो आला राम । जाहला निष्काम तोचि भक्त ॥
इंद्रियांची वाट खुंटली  माघारा । वळलीसे घरा निवृत्तिच्या ॥
असोनिया देही झाला देहातीत । धन्य कीर्तिवंत तोचि एक ॥
तुकड्यादास म्हणे कळावया वर्म । मुखी राम राम भावे भजा ॥