केले तरी काय कवित्व सुंदर
दांभिक साधू
केले तरी काय कवित्व सुंदर । श्रृंगारिले फार कवित्वाने ॥
न होती ते संत कवी कवित्वाने । बहुू बोले, भाषणे रंगी भंगी ॥
दाखवण्याच्या रीती सद्गुण वाखाणी । क्रिया-कर्म-नेमी नम संती ॥
तुकड्यादास म्हणे कवी घरोघरी । परी न ये सरी आचाराची ॥