दाखवीती लोका न देखिले ऐसे

दाखविती लोका न देखिले ऐसे । लावोनिया पिसे सोडी जना ॥
नवलाची कहाणी लांबविती तोंडी । वेदांताची कोंडी मांडोनिया ॥
सद्भक्ताते निंदी निंदकासी वंदी । लागोनिया छंदी स्वार्थाचिया ॥
तुकड्यादास म्हणे ऐकरे साधका ! । सोडू नको एका सद्गुरुराया ॥