गुरुत्वाचा ताठा भक्ती नाही अंगी
खरे संत
गुरुत्वाचा ताठा भक्ति नाही अंगी । हो का ऐसा जोगी व्यर्थ आम्हा ॥
सेवकाची सेवा घेई अभिमाने । गुरुची लक्षणे ऐसी नाही ॥
झाला शास्त्राभ्यास परी घाती मन । ऐसे संतजन नको आम्हा ॥
तुकड्यादास म्हणे गुरुची लक्षणे । काया वाचा मने भक्ति ज्यासी ॥