अंगणी रंगणी लोचनी

अंगणी रंगणी लोचनी रसनी । दिसे जनी वनी एक आत्मा ।
नाही भेदभाव उंच नीच काही । मी तू पण नाही संदेहासी ॥
सुखदुःख भोग त्याग एकरूप । निमाला संकल्प ठायी ठायी ॥
तुकड्यादास म्हणे तेचि सिद्ध खरे । जैसे लवण विरे अब्धिमाजी ॥