ऐसे नव्हे ज्ञान चढवी अहंभाव

                               ज्ञान-वर्म
ऐसे नव्हे ज्ञान चढवी अहंभाव । वाढवी संदेहो, तोंडी थाटे ।।
ऐसे नव्हे ज्ञान जे भोगी आसक्त । सांगती विरक्त लोकांमाजी ॥
ऐसे नव्हे ज्ञान दाखवी भविष्य । करोनिया शिष्य द्रव्य घेती ॥
तुकड्यादास म्हणे ज्ञान ऐसे जाणा । आपुला आपणा स्वरूप- बोधू ॥