कळते परी हे नुमजे सर्वांशी

कळते परी हे नुमजे सर्वांसी । कोण्या विरळ्यासी वर्म ठावे ॥
सांगतील मुखे सर्व ब्रह्मज्ञान । अनुभवाची खूण नेणे कोणी ॥
वाचोनी पुराणे बद्ध झाले शहाणे । परी कर्म नेणे कैशा परी ॥
तुकड्यादास म्हणे कळतिया जना । आलो मी शरणा दावा कोणी ॥