करा काहीतरी मग सांगा लोका

करा काहीतरी मग सांगा लोका । नाहीतरी निका कोणी नेघे ॥
निंदकाचे थवे राहतील सर्वे । मांडतील भाव दृष्टिपुढे ।।
सुलभ नव्हे ज्ञान पडे आडरान । दुःखासी भोगून काळ काढा ।।
तुकड्यादास म्हणे स्वये करा काही । तेव्हा जनाचाही भाव वाढे ।।