जयाचिये मन विकल्परहित

जयाचिये मन विकल्परहीत । संकल्प संकेत नाही जया ।।
कदा नये वाणी अनृत भाषण । देहाचे मीपण नाही जया ।।
कनक कांतेची नाही ज्या आसक्ति । नामावीण मति दुरजी नाही ॥
तुकड्यादास म्हणे तोचि ब्रह्मज्ञानी । स्वये आचरोनि सांगे लोका ॥