कोणाचा हा देह दाखवावीसी लोका
स्वानुभव-साधन-पथ
कोणाचा हा देह दाखविसी लोका ? । म्हणसी आणिका पहा पहा ।।
काळाचे धन सर्व काळरूप । के जाईल चूप करोनिया ॥
सुखी नको होऊ दुःख मागे आहे । काळ वाट पाहे मोला घ्याया ॥
तुकड्यादास म्हणे साध काही तरी । नाहीतरी भरी व्यर्थ गेला ॥