त्रिविध हे जग मायेच्या आधीन
त्रिविध हे जग मायेच्या आधीन । तेथे झणी मन वसो देशी ॥
वसो देशी मन होऊनी आसक्त । देवाशी विभक्त होशी बापा ! ॥
होशील विभक्त खोवशील जन्म । संतांचिये वर्म सांडोनिया ॥
तुकड्यादास म्हणे विश्वाचा प्रकाशू । तेथेचि विश्वासू जडो देई ॥