करुनिया चित्त स्वस्थ

करूनिया चित्त स्वस्थ चित्तामाजी । आळवावा अर्जी गुरुराव ।।
पहावे    चरण    नेत्राते   सारून । देही देह - भान न ठेवावे ।।
मग उठे स्फूर्ति निर्विकल्प दीप्ति । समरसे वृत्ति वृत्तिमाजी ॥
तुकड्यादास म्हणे निर्गुणोपासना । ऐसी संते जना वर्णियेली॥