संकल्पाचे स्थान मायेचा आधार

संकल्पाचे स्थान मायेचा   आधार । तेथे तू निर्धार धरी ऐसा ।।
ज्ञानाचिया तेजे जाळी संकल्पासी । स्थिर हो केंद्रासी परेचिये ॥
साक्षी स्वरुपाचा करूनि आठव । वाढवी लाघव आनंदाचे ।
तुकड्यादास म्हणे जाणावे जाणणे । मूळ घरी उणे न राहीचि ॥