लक्षालक्षी जया साधले साधन

लक्षालक्षी जया साधले साधन । तुटले बंधन आसक्तिचे ॥
ठेवू गेला लक्ष जाहला अलक्ष । वृत्त्ति निरपेक्ष सहजी झाली ॥
साधियेली संधी सोहं- हंस -पणी । केली बोळवणी अज्ञानाची l
तुकड्यादास म्हणे कळे ज्ञानियासी । बोलका भ्रमेसी वर्म नेणे ॥