अहंकाराची धूनी निघे घरातूनि

आत्मज्ञान (वेदांत-सार)
अहंकाराची धुनी निघे घरातूनि । धूर सर्वांगूनि वेष्टियेळा ..
तेणे झाला मळ पापपुण्य चिका । विसरला निका जीव भक्ति ॥
लागला बंधनी कर्म करायासी । सुख दुःख त्यासी भोगा आले ॥
तुकड्यादास म्हणे नको अहंकार । प्रभुसत्ता थोर लीला त्याची ॥