ज्ञानाविन गम्य कळेना कशाचे

ज्ञानावीण गम्य कळेना मोक्षाचे । ज्ञान सर्वस्वाचे नेत्र जाणा ॥
ज्ञाने कळे भक्ति, ज्ञाने वाढे दीप्ति । ज्ञानेचि विरक्ति पावे देहा ।॥
ज्ञाने अधिष्ठान कळे आत्मयाचे । गम्य त्रिपुटीचे ज्ञाने कळे ।॥
तुकड्यादास म्हणे ज्ञानाच्या भूमिका । सात आहे, ऐका सावधान ।॥