शुभेच्छा प्रथम भुमिका जाणावी
शुभेच्छा प्रथम भूमिका जाणावी । शुभ इच्छा गावी भक्ति भावे ॥
व्यर्थ जन्म माझा, काही ना मी केले। मळ वाढविले बुद्धिमाजी ॥
भोगिले विषय सूकरासमान । कधी धर्मदान दिले नाही ॥
तुकड्यादास म्हणे वैतागूनि चित्ती । सद्गुण चिंतिती शुभेच्छा ती ॥