शुभेच्छा पावोनी विचारणा झाली

 शुभेच्छा पावोनी विचारणा झाली । तिसरी लागली तनुमानसा ॥
भोग भय सारे जाती पळोनिया । विरक्ति देही या पावलीसे ॥
विषय नाशले वश झाला काम । पावली आराम बहिरिद्रिये ॥
तुकड्यादास म्हणे रुचि फिकी झाली। तनुमानसा आली जया भक्ता ॥