ठेवोनि विश्वास प्रभूरायावरी

ठेवोनी विश्वास प्रभुरायावरी । 
रहावे संसारी अनासक्त  ।।
बांधोनिया कर्म-दोरी प्रभुपायी  । 
निष्काम सर्वही कर्म करा ।।
सुखदःख हानि-लाभ है देवाचे । 
आपूलिये साचे  काय जाते ? ॥
तुकड्यादास म्हंणे नोकरा समान । 
रहावे आपण कर्म-भूमी ।।