तिन्ही भूमिकांचा संघ एक होता
तिन्ही भूमिकांचा संघ एक होता । त्रिगुणाची वार्ता पूर्ण झाली ।॥
शुद्ध सत्वगुण राहतो अंतरी । वृत्ति ही निर्धारी रमे तेथे ॥
ऐसे झाल्यावरी वाढे सत्वापत्ति । विरळाचि संती क्रृपा
पावे ॥
तुकड्यादास म्हणे चवथी ही भूमि । सत्वापत्ति नामी सिद्ध केली ॥