सर्व धर्मी वृत्ती

सर्व धर्मी वृत्ति सोडोनिया द्यावी ।
मजकडे लावी  मनोभावे ॥
राहोनी निर्भय जन्मयात्रा करा । 
आसक्तिचा झरा दुरावोनी ।।
कोण मी ? हे वर्म जाणावे निश्चये। 
वचन केशवे मांगितले ॥
तुकड्यादास म्हणे गीता सांगे हेचि 
वचने ही साची भुलू नये ।।