सातवी भूमिका तुर्यगा जाणावी
सातवी भूमिका तुर्यगा जाणावी । ज्ञानिये पावावी तदात्मता ।
बिंब-प्रतिबिंब भेद हा मावळे । स्वरूप निर्मळे आपणचि ॥
ज्ञानादि विज्ञान सर्व मावळले । वस्तुरूप झाले तुर्यगेसी ।॥
तुकड्यादास म्हणे पावली विश्रांति । मुळचिये स्थिती प्राप्त होता ॥