अंधारिया रात्री दिसते का तुम्हा
अंधारिया रात्री दिसते का तुम्हा? । कल्पनेच्या भ्रमा फुका जाय ।।
कोणीही भेटला तरि काय जाणे? । काळोखाचे जिणे अमंगळ ॥
पाहिजे प्रकाश ओळखाया तरी । येर काय करी आपुल्याने? ।।
तुकड्यादास म्हणे ज्ञान-दिवा लावा । तुमचिया गावा हरी राहे ।।