जया तत्वे देव भरला सर्वांगी

 जया तत्वे देव भरला सर्वांगी । पावावे त्यालागी ज्ञानियाने ।।
जड सूक्ष्म सर्व पालथावे आधी। पंचिकरण संधी साधोनिया ।।
क्षेत्राते सारोनी क्षेत्रज्ञ जाणावा । अंतर्यामी-देवा भेटावया ।।
तुकड्यादास म्हणे गुरुच्या संगती । कळेल एकांती देव कैसा ।।