सांगाव्या ह्या गोष्टी तुम्हा

                   माझा बोध कोणा करिता ?
                              ( संतांस )
सांगाव्या ह्या गोष्टी तुम्हा जना पुढे । ऐसे नाही गाढे ज्ञान माझे ।।
परि हा स्वभाव पडला प्रारब्धे । उफाळती शब्द उल्हासाने ।।
मानू नका वीट श्रेष्ठ महामुनी ! । आपुले चरणी खेळो आलो ।।
तुकड्यादास म्हणे नाही अधिकार । पायाचा किंकर
आपुल्या मी ॥