तुमचीया सत्ते मी सर्व बोलेन
तुमचिया सत्ते मी सर्व बोलेन । नाही तरी ज्ञान कैचे आम्हा ?।।
नाही शास्त्राभ्यास विद्याज्ञान काही। कला कौशल्यही नुमजे आम्हा ।।
नाही योग याग नेम धर्म तेही । जपतपादिही न कळे आम्हा ।।
तुकड्यादास म्हणे तुमचिया कृपे । मार्ग होती सोपे सर्व काही ।।