दिसते ते नोहे आहे आत वर्म

दिसते ते नोहे आहे आत वर्म । कळावे हे मर्म ज्ञानासंगे ॥
धर्म तोचि आहे वर्माचिया अंगी। कळावे हे रंगी साधुसंगे ।।
जैसा देव दिसे देवुळाचे आत । देवूळ समस्त देव नोहे ॥
तुकड्यादास म्हणे जगाचा व्यवहार । ज्ञानाचा विचार एक नोहे ॥