श्रेष्ठचीये कुळी पैसे पुत्र यावे

श्रेष्ठांचिये कुळी ऐसे पुत्र यावे । आम्हा न पाहावे काही केल्या ॥
जया घरी ध्वजा गज सांप्रदाय । पुत्र धरी पाय धनिकाचे ॥
भोगावया चैन पावला हा देह । दाखवी संदेह लोका पुत्र ।।
तुकड्यादास म्हणे उणे होते काही । म्हणोनिया ग्वाही दिसो आले ॥