घडो काही सेवा हा माझा उद्देश
(खरा उद्देश)
घडो काही सेवा हा माझा उद्देश । यावीण सायास दुजे नाही।।
नरजन्मा येऊनी करू काही ठेवा । तरी पावू देवा भक्तिभावे।।
नाहीतरी गेलो काळाचिये मुखी । सदा सुखी दुःखी गर्भवासे ।
तुकड्यादास म्हणे सेवू चरण रज । उद्धरू सहज हरि-चिंतने ॥