चक्र संसाराचे फिरे दाहीदिशा
२६. संसार-चक्र
सुख - विचार
चक्र संसाराचे फिरे दाही दिशा । नाही भरवसा याचा काही ॥
कधी सुखदुःख, कधी पुण्यपाप । कधी स्थिर संताप होई जीवा ।।
कधी रंकराजा, कधी जन्मनाश । ऐसा कर्म-पाश चाले सदा ।।
तुकड्यादास म्हणे चाले सदा ऐसे । घाणियाचे जैसे बैल चाले ।।