दुःख मूळ सर्व संसाराची वार्ता

दुःखमूळ सर्व संसाराची वार्ता । सुखाचिये कथा जरा नाही ।।
जन्म पावलिया दुःख लागे माथा । शेवटी मरता दुःखरूप ।।
विषयाच्या आशे तुच्छ मोक्ष-सुख । शेवटी स्त्रीमुख ओंगळवाणे ॥
तुकड्यादास म्हणे संत बोलताहे। संसाराच्या हाये मेले दुःखी ।।