जन्मतांची दुःख गर्भवासी थोर
जन्मतांचि दुःख गर्भवासी थोर । निघता बाहेर ग्रासे काळ ।।
वाट पाहे उभा केव्हा या खाईल ? । आयुष्य जाईल कधी याचे ? ।
त्यातूनि चुकला, काम क्रोध वैरी । होताति सामोरी वेळोवेळा ।।
तो झाला माघारा, बाइलेचा त्रास । होऊनिया दास बैसे ठायी ।।
तुकड्यादास म्हणे सुखा नाही ठाव । पंढरीचा राव देखिल्यावीण ॥