दुःख संसाराचे काय किती

दुःख संसाराचे काय किती सांगो । मरो किंवा जगो न सरे काही ॥
जाळी चितेसम जिवंत देहासी । जरा वासनेसी चैन नाही ।।
करा तीर्थयात्रा चला बद्रिकेशा । परि आशा-पाशा न सोडी हे॥
तुकड्यादास म्हणे दुःखमूळ जन्म । प्रभुवीण क्षेम न पावे हा।।