सुखाचेची साथी मित्र गोत सर्व
प्रेम-तत्व
सुखाचेचि साथी मित्र गोत सर्व । आघाती घे धाव कोणी ना हे।
मारलिया हाका साथ दे ना कोणी । रडता हासोनि पाहे तोंडा।
प्राणही व्याकुळे पडे पृथ्वीवरी । दया कोणी तरी नेघे जगी ।।
तुकड्यादास म्हणे एका प्रभुवीण। कराया रक्षण कोणी नाही॥