जग हे स्वार्थाचे मूळ

जग हे स्वार्थाचे मूळ अनर्थाचे । तयाने जनाचे हित नोहे ॥
स्त्रियेचेनि स्वार्थ साधी आपुलासा । स्त्रियेचा भरवसा करो नेणे ॥
पुत्रावरी प्रेम करी आपुल्याचे । परि ते पुत्राचे प्रेम नोहे ॥
तुकड्यादास म्हणे आपुलियासाठी । पाडतो हा गाठी स्वार्थी नर ॥