संसारासी दास करा
२७.आनंद-कुंज
सुखाचा साधन-मार्ग
संसारासी दास करा । आणा आपुल्या माघारा ॥
नका जाऊ त्याच्या बळी । तोचि करील रांगोळी ॥
जगी कोणी नाही धाला । ज्याने संसार थाटिला ॥
तुकड्यादास म्हणे टाळा । भोग संसाराचा गाळा ॥