संसाराचे तोडा तोंड

संसाराचे तोडा तोंड । वरा ब्रह्मानंद गोड ।
लागा परमार्थाच्या वाटे । दर करा नर्क काटे ॥
बहू जनी अनुभव । ठेला संसाराचा ठाव ॥
तुकड्या म्हणे सुख नाही । गुरु-पायावीण काही ॥