ऐकली पुराने नाना शास्त्रांतरे

                           सत्य सुखाचा शोध
ऐकली पुराणे नाना  शास्त्रांतरे । मन हे विकारे स्थीर नाही ।।
जगाची ऐकली भलीबुरी निंदा । परि त्या गोविंदा भेटि नाही ।।
साधनांच्या संगे देहा कष्टविले । तरि ना पावले शांति - सुख ।।
तुकड्यादास म्हणे सुखा तै लाभलो । संतापायी झालो लीन जेव्हा ॥