अघोर काननी व्याघ्रlदीका
अघोर काननी व्याघ्रादिका - स्थानी । बर्फाचियाहनि गेलो आम्ही ॥
पायीचा प्रवास बहु केला त्रास । परि या चित्तास शांति नाही ।।
दरी खोरी किती भुयारा शोधिले । सुख ना लाधले क्षण आम्हा ।।
तुकड्यादास म्हणे सुखावलो अंगी । जाता पांडुंगी शरण भावे ॥