गाडी घोडे बहु घातले या धूळी
गाडी घोडे वहु घातले या धुळी । बैसलो सकळी हाकावया ।।
हत्ती उंट रोही यापे केली स्वारी । यसोनी मोटारी तोडियेल्या ॥
आगगाडी बहू रंगाची नावाची । वेगाची स्थळांची, बसुनी गेलो ॥
तुकड्यादास म्हणे सुख ना लाधलो । वाहनी शांतलो सदव्रृत्तिच्या ॥