लक्षावधी पैसे फेरले या हाती
लक्षावधी पैसे फेरले या हाती । सावकार किती हालवोनि ॥
मागोनी धनिका सुखविले रंका । पुरि नाही सुखा प्राप्त झालो ।।
बहु यज्ञ याग मांडलेति सत्र । सप्ताह सर्वत्र लाखो केले ॥
तुकड्यादास म्हणे सुख नाही जरा । घेता आत्म-वारा सुखी झालो ।।