सुखी हरि भक्त, ज्ञानी, की विरक्त

सुखी हरी-भक्त, ज्ञानी,की विरक्त । कर्मी अनासक्त निष्कामी जो ।
तयावीण सुखी जगी नाही कोणी । पहा त्रिभुवनी धुंडाळोनी ॥
धनाचिये सुखी दुःख पावे अंती । होतसे फजीति यमद्वारी ।
तुकड्यादास म्हणे सुखी ऐसे व्हावे । दुःख न पहावे डोळा कथी ॥