कपी खेळ आठवतो मुल
जीव-स्वभाव व ज्ञान-प्रभाव
कपी खेळ आठवतो मुल । कळेना तयाला कर्म धर्म ॥
खाजे विजे लेणे राहणे स्वतंत्र । वृत्ति तिळमात्र कामी नोहे ॥
संसाराचा भार पडताचि वरी । खेळ सर्व हरी क्षणी त्याचा ॥
तुकड्यादास म्हणे तैसे होता ज्ञान । संसाराचे भान सांडी जीव ।।