चोरी चोरी करी भिऊनिया वागे
चोर चोरी करी भिऊनिया वागे । लपे पुढे मागे पाय टाकी ॥
द्रव्य घेऊनिया न चाले निर्भय । त्याचे त्यासि भय मोठे वाटे ॥
शिपाई भासता द्रव्य दुरी टाके । उभा राहे धाके आडहोनी ।॥
तुकड्यादास म्हणे विषय सेविता । ज्ञानियाच्या चित्ता दु:ख होय ॥