ज्ञानीया संसार ज्ञानरूप वाटे

ज्ञानिया संसार   ज्ञानरूप   वाटे । अज्ञानासि काटे रुते अंगी ॥
जे वस्तु ज्ञानिया  सुख देई सदा । अज्ञाना आपदा आली वाटे॥
ज्ञानिया सकळ दिसे ब्रह्मरूप । अज्ञानासि पाप -  दृष्टी दिसे ॥
तुकड्यादास म्हणे आहे दृष्टि-कोन । कळावया ज्ञान शिका संती ॥