वेडियासी सर्व जगतची वेडे हे

वेडियासी सर्व जगचि वेड़े हे । तैसाचि तो राहे जगामाजी ॥
तस साधुसंता संत सर्व दिसे । जनी वनी   भासे   पांडुरंग ।।
दुर्जनासी तैसा दुर्जनाचा भास । करावया नाश आपुलाचि ।
तुकड्यादास म्हणे जो जैसा असेल । त्या तैसे दिसेल जगामाजी ॥