इंद्रियांच्या भावी सूर्य चढे वरी
सुखाची तात्विक मिमांसा
इंद्रियांच्या भावी सूर्य चढे वरी । परि शास्त्रांतरी ऐसे नाही ll
सूर्य स्थीर राहे पृथ्वी फिरे फेरा । कळता विचारा सार आहे ॥
विचार या रीती करावा अंतरी । सुख कोणेपरी प्राप्त होय ? ॥
तुकड्यादास म्हणे इंद्रियांचे सुख । सुख नोहे दुःख ज्ञानदृष्टी ॥