तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आहे जवळी आनंद
आहे जवळी आनंद । काय घेसी विषय - स्वाद ? ॥
आगंतुक बहीर्मुख । काय सांगे त्याचे सुख ? ॥
क्षणोक्षणी एके वाटे । पुढे दुःखचि ते थाटे ॥
तुकड्यादास म्हणे जाणा । ब्रह्मरसाचिया खुणा ॥